"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Saturday, October 05, 2024

नवरात्र नव आवाहन

उत्सव नवरात्रीचा, 
उत्सव शक्तीचा, 
उत्सव जागरूक हिंदू अस्मितेचा,

  दरवर्षी त्याच घटरूपी शरीरातील भावना बदलू शकतात. जसं पेरावं तसं उगवतं ना? चला आपण स्वतः मधील दैवी अंंशाला नव्यानी ओळखुया, जागवुया आणि पुजुया.

🚩♥️🚩

🔹पहिली माळ -

आधी आत्मा! पहिल्या दिवशी छान नाहुन माखून, खुषीने जे आवडेल ते लेवून, जे आवडेल तेच करावं. करण्याआधी मनाला एक प्रश्न मात्र विचारायचा आहे, मी हे का करते आहे? मला आवडतय म्हणुन? का जग करतय म्हणुन ? मला करून बघायचय म्हणून? आजचा दिवस तुमचा असावा, जगाची नक्कल करण्याचा नाही. तुम्ही स्वतःशी बसून स्वतःला विचारायचं आहे की,  तुम्ही जगापेक्षा वेगळ्या का आहात? मग तेच करा. कुणी छान स्वयंपाक करेल, कुणी पेंटिग, कुणी छान नटेल, कुणी देवासमोर बसुन मनोभावे पूजा करेल, कुणी तरी कुणाला तरी माफ करेल किंवा माफी मागुन स्वत:च मन मोकळं करेल. मनातलं स्वत:ला आवडणारच फक्त करून संध्याकाळी छान आरती करा. दिव्यात समाधानानं उजळणारा तुमचा चेहरा बघून ती देवी आई नक्की सुखावणार.

🚩♥️🚩

🔹माळ दुसरी -

    तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रायोरिटीज काळानी जरूर बदलणार, पण तरीही अत्यंत महत्वाची असणारी माणसं तिच रहाणार. आज त्यांच्याकडे पुर्ण लक्ष द्यायचं, सांगुन सवरून बरका. त्यांच्या आवडीचं काही शिजवा, त्यांना भेट आणा, ओवाळून हातात द्या आणि त्यांच्या पर्यंत हे जरूर पोचवा कि तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. आपण सेल्फी टाकताना इतर दिवशी लाजत नाही, ना नवरात्रीचे रंग पाळताना. मग आपल्याच माणसांवरतं प्रेम (जग) जाहिर करायची कसली लाज? विश्वास ठेवा. फार मोठी ताकद मिळते. इडापिडा टळते, एकी वाढते. कुठल्या मातेला आपल्या लेकरांना समाधानी बघुन आनंद नाही बरं होणार?

Thursday, October 03, 2024

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान

 लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी...

~~~~~~~~

3 ऑक्टोंब मराठी अभिजात भाषा गौरव दिन...

मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा...

मिळाली महाराष्ट्राला नवीन ऊर्जा...!!

आहेच दर्जेदार भाषा मराठी

घडविले तिने थोर महात्मे, संत, गुणवंत, विचारवंत...

वाटतो आम्हा तिचा अभिमान, वाढवा आता पुन्हा तिची शान, वाढेल आणखी तिचा मान..!!

बोलू मराठी, लिहू मराठी, गाऊ मराठी ,काहीही तिच्या साठी,

आहे आम्हा अभिमान...!!

भागेल भूक, तहान, वाढेल जगात तिची शान..!!


    पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने मराठी भाषेला 3 ऑक्टोंबर 2024 ला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला, 

~~~~~~~~


★मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला >>>

   महाराष्ट्रातील १२ कोटी मराठी भाषिकांचे स्वप्न पूर्ण झाले विविध सामाजिक सांस्कृतिक लेखक कवी साहित्यकार यांच्या लढयांना यश मिळाले. व अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला केंद्र व राज्य सरकार यांचे जाहीर आभार.

   माय मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी प्रेमीजनांचे खूप खूप अभिनंदन...!!

          🌹💐🌹💐🌹

  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे काही महत्त्वाचे परिणाम होऊ शकतात:-

विनायक दामोदर सावरकर

भारतीय थोर क्रांतिकारक, राजकारणी, वकील, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक  

   ★ विनायक दामोदर सावरकर

    ━═•●◆●★●◆●•═━

●जन्म :~ २८ मे १८८३ 

भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र,

●मृत्यू :~ २६ फेब्रुवारी १९६६

दादर,मुंबई,महाराष्ट्र,भारत

●चळवळ:~ भारतीय स्वातंत्र्यलढा

●संघटना:~ अभिनव भारत

अखिल भारतीय हिंदू महासभा

●प्रमुख स्मारके :~ मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमानधर्म:हिंदू


 ★ विनायक दामोदर सावरकर ★

     हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी  कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक  चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी,  हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ,  विज्ञानाचा  पुरस्कार व जातिभेदाला  तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक,  भाषाशुद्धी व लिपिशुद्धीह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत  साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

वाचन प्रेरणा दिन... 15 आॕक्टोबर

 भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती   निमित्ताने 15 ऑक्टोबर 2018 पासून हा दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा होत आहे.

   ★डॉ.अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम★

   भारताचे मिसाईल मॅन, बुद्धिमान, ज्ञानी, नि:स्वार्थी आणि सर्वांचा प्रिय असा नेता जगाने पाहणे खरोखरच दुर्मिळ आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, एरोस्पेस आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशात क्रांती घडवून आणणारी व्यक्ती म्हणजे डॉ. अब्दुल कलाम. भारताची अणुचाचणी दोनदा पाहणारी व्यक्ती होती. डीआरडीओ आणि इस्रोच्या प्रगतीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

  विज्ञानाचा परम भोक्ता असणारे वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०), भारतरत्‍न (१९९७). राष्ट्रपती होण्यापुर्वी ’भारतरत्‍न’ हा भारताचा सर्वोच्‍च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत.

  आदरणीय डॉ. अब्दूल कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत.

Wednesday, October 02, 2024

लाल बहादूर शास्त्री

  मृदु स्वभावाचे पण कर्तव्यकठोर वृत्तीचे,  कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे आपले दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीजी...

पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी.

 लालबहाद्दर शास्त्री यांच्या सारख्या खऱ्या देशभक्ताची जयंती आज झांकोळली जाते हे आपलं दुर्दैव..!

"जय जवान जय किसान” 
        हा मंत्र देणारे...

लाल बहादूर शास्त्री ❒ 
━═•●◆★★◆●•═━
●जन्म :~ २ आक्टोबर १९०४
●मृत्यू :~ ११ जानेवारी १९६६

           लाल बहादूर शास्त्री  यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले. त्यांना जन्मत: वैभव लाभले नाही. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.

~~~~~~~~

" लाल बहादूर शास्त्री जयंती सोपे व प्रभाव पूर्ण भाषणे साठी क्लिक करा >>   

~~~~~~~~

  महात्मा गांधींचे पहिले दर्शन त्यांना १९१६ साली झाले. त्यावेळी ते आफ्रिकेत सत्याग्रह करून नुकतेच भारतात आले होते. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून‍ शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. 

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

आशा भोसले ज्येष्ठ पार्श्वगायिका

  भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत...!! आशा भोसले यांसारखी बहुगुणी, अष्टपैलू गायिका पुन्हा होणे कठीणचं...!! आपल्या सदाबहार आवाज...