SUTRASANCHALN TABS
- Home
- महात्मा गांधी
- संभाजी महाराज
- राजमाता जिजाऊ
- सूत्रसंचालन नमुना
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज
- लोकमान्य टिळक
- शहीद दिवस
- वाचन प्रेरणा दिन
- डॉ.आंबेडकर शायरी/चारोळ्या
- मदर्स डे
- वि.दा.सावरकर
- स्वातंत्र्य दिन पूर्व तयारी
- युगपुरुष स्वामी विवेकानंद
- अष्टविनायक गणपती दर्शन
- सेवालाल महाराज जयंती
- महाराष्ट्र दिन
- रमाबाई आंबेडकर
- लाल बहादूर शास्त्री
- शिवाजी महाराज जयंती
- गुरुपौर्णिमा
- महिला-दिन
- प्रजासत्ताक दिन
- शिक्षक दिन -डॉ. राधाकृष्णन जयंती
- जयंती व राष्ट्रीय दिन
- स्पर्धा परीक्षा तयारी सर्व विषय
Saturday, April 26, 2025
महाराष्ट्र दिन विशेष
Friday, April 25, 2025
राष्ट्रीय गणित दिवस
गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन
◆जन्म - २२ डिसेंबर १८८७ (तामिळनाडू)
◆स्मृती - २६ एप्रिल १९२० (तामिळनाडू)
महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म तामिळनाडू येथे झाला. त्यांचा जन्मदिन हा 'राष्ट्रीय गणित दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. अवघ्या ३३ वर्षाच्या अल्पायुष्यात गणित विषयावर त्यांनी अनेक संशोधनपर लेख लिहिले. त्यांच्या या अभूतपूर्व कार्यामुळे इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले तर केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होते. गणित दिनानिमित्त त्यांच्या गणितातील उल्लेखनीय कामगिरीस व स्मृतीस विनम्र अभिवादन !
Tuesday, December 24, 2024
मी देव पाहीला
एका भयाण रात्री "मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा*अभ्यास करताना पाहिला.
*थंडीचे* दिवस होते. *कुडकुडत* होता पण वाचनात *मग्न* होता.
हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ.
दिवसा कधी दिसत नसायचा.
खुप *जिज्ञासा* होती त्या मुलां बद्दल जाणण्याची.
एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो.
मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी *पार्सल* घेऊन जाऊ.
*रात्रीचे साडेबारा* वाजले असतील.
मी त्या मंदिराकडे आलो.
तर तो *मुलगा* नेहमी प्रमाणे *मंदिराच्या पायरीवर* अभ्यास करत दिसला.
मी *गाडी* थांबवली. त्याच्या जवळ गेलो.
मला बघून तो गालातल्या गालात *हसला.*
जणू माझी त्याची जुनी ओळख असावी.
मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस?
सर माझ्या *घरात लाईट* नाही.
माझी *आई आजारी* असते.
दिव्यात *रॉकेल* घालून अभ्यास करायला. माझी *ऐपत* नाही.
बाळ तू मला बघून का *गोड हसलास* ?
सर तुम्ही *देव* आहात !
नाही रे!
सर तुम्ही माझ्या साठी *देवच* आहात.
ते जाऊदे तू *जेवलास* का?
मी तुझ्यासाठी *खाऊचं पार्सल* आणलं आहे.
सर म्हणूनच मी *हसलो.*
मला माहित होतं.
तो ( देव ) कोणत्याही *रूपात* येइल पण मला *भुकेलेला नाही* ठेवणार.
मी जेंव्हा जेंव्हा *भुकेलेला* असतो, तो काहींना काही मला *देतोच.*
कधी *नवसाचे पेढे* तर कधी *फळ* तो मला देऊन जातो.
आज मी *भुकेलेला* होतो पण *निश्चिंत* होतो.
मला माहित होतं....तो काहीतरी कारण करून मला *भेटायला* येणार आणि *तुम्ही* आलात.
तुम्ही *देव* आहात ना !
मी *निःशब्द* झालो, नकळत माझ्या कडून *पुण्याचं* काम घडलं होतं.
रोज *कर्जाच्या* ओझ्याखाली दबताना *देवाला* कोसत होतो. त्याने आज मला *देवाची उपाधी* देऊन लाजवलं होतं.
त्याने तो अर्धवट *खाऊ* खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या *आईला* देऊन येतो.
माझे डोळे *तरळले.*
त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं.
तो पाच मिनिटांनी परत आला.
त्याच्या ओंजळीत *पारिजातकाची फुलं* होती.
सर,
माझी *आई* सांगते, ज्या *परमेश्वराने* आपल्या *पोटाची खळगी* भरली त्याच्या चरणी *ओंजळभर फुलं* तरी वहावीत.
क्षणभर *डोळे* बंद केले आणि त्या बंद दारातल्या *पाषाणाकडे* पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड *हसण्यासारखं* वाटलं.
नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.
*शाळा, कॉलेज, मंदिर बंद* झाले.
देवळं ओस पडली. देवळांना *कुलूप* ठोकली आणि रस्त्यावर *शुकशुकाट* झाला.
असच एके दिवशी *त्या* मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या *देवळाकडे* डोकावलं.
रात्रीची वेळ होती.
देवळाची पायरीवरील *लाईट बंद* होती आणि तो *मुलगा* कुठेच दिसला नाही.
वाईट वाटलं मला.
या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?
काय खात असेल ?
कसा जगत असेल ?
असे *ना ना प्रश्न* आ वासून उभे राहिले.
कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी *प्राण* गमावले.
असाच आमचा एक मित्र *पॉजिटीव्ह* होऊन दगावला.
मी त्याच्या *अंत्य संस्काराला स्मशानात* गेलो होतो. *अंत्यसत्कार* झाले.
सर्व आपल्या घरी निघाले.
निघताना हात पाय धुवावे म्हणून *शंकराच्या* मंदिरा शेजारील *नळावर* गेलो.
पाहतो तर तो मुलगा नळावर *स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे* धुऊन त्या *स्मशानाच्या भिंतीवर* वाळत टाकत होता.
मला बघून त्याने आवाज दिला,
सर ....
अरे तू *इथे* काय करतोस ?
सर आता मी *इथेच राहतो.*
आम्ही घर बदललं.
*भाडं* भरायला पैसे नव्हते.
त्यातच लॉकडाऊन मध्ये *शिव* मंदिर बंद झालं आणि पायरी वरची *लाईटही* बंद झाली.
मग मला घेऊन आई इथे आली.
काही झालं तरी *शिक्षण थांबता* कामा नये असं तिनं सांगितलं आहे.
त्या *शिव* मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या *शव* मंदिराचे दरवाजे *कधी बंद होत* नाहीत.
तिथे *जीवंत माणसं* यायची आणि *इथे मेलेली.*
ह्या लाईट खाली माझा *अभ्यास* चालू असतो.
सर मी *हार* नाही मानली.
*आई* सांगायची........
ज्याने *जन्म* दिला तोच *भुकेची खळगी* भरणार.
बरं..... तुझी आई कुठे आहे ?
सर ती *कोरोनाच्या आजारात *गेली.
तीन दिवस ताप खोकला होता.
नंतर दम अडकला.
मी कुठे गेलो नाही.
इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी* दिला.
१४ दिवस इथंच ह्या खोपीत *होम क्वाँरनटाईन* राहिलो.
*सरकारी कायदा मोडू* नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं *ती* सांगायची.
*आईच्या अस्थी* समोरच्या नदीत *विसर्जित* केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या *अग्नी* देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच *क्रियाकर्म* आटपलं.
सर तरी मी हरलेलो* नाही पण दुःख एव्हढच आहे की मी *पास झालेलो पहायला आई* ह्या जगात *नाही.
ती जिथे ज्या जगात असेल तिथे *खुप खुश असेल हे माझं यश* बघून.
कालच माझा *रिजल्ट* लागला आणि मी शाळेत *पहिला* आलोय.
आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे *शिक्षक* करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय.
*ऑनलाईन अभ्यास करायला माझ्या जवळ मोबाईल सुद्धा नाही.
असो सर,
तुम्ही का वाईट वाटून घेता ?
तुम्हाला मी *पास* झाल्याचा *आनंद* नाही झाला ?
सर,
तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा.
त्याने छोट्याशा *डब्यातून साखर* आणली होती.
चिमूटभर माझ्या हातावर ठेवली.
सर *तोंड गोड* करा.
तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या *तोंडावर* त्या नळाचं पाणी मारून *भानावर* आलो.
*भरलेले डोळे* लपवण्यासाठी *तोंड धुतले.*
सर, मला माहीत होते, *देव* या जगात आहे आणि तो माझ्या *आनंदात माझी पाठ थोपटायला* नक्की येणार.
त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या *खिशातला* माझा *नवा मोबाईल* त्या मुलाच्या *हातावर* टेकवला आणि त्याची *पाठ थोपटून* निमूटपणे *बाय* करून *स्मशानाबाहेर* चालू लागलो.
आता दर महिन्याला *मी* त्याचा मोबाईल *रिचार्ज* करतो......
न सांगता.
खरा देव तर कधीच नाही दिसला पण,
मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. ....
देव पाहिला....
🙏 धन्यवाद !! 🙏
हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं..
Saturday, December 14, 2024
दत्तजयंतीच्या शुभेच्छा...
दत्तरूपी गुरुतत्त्वाचे महात्म्य
‘दत्तजयंती’ म्हणजे त्रिदेवस्वरूप दत्तगुरूंचा अवतरणदिन ! शिष्याचे अज्ञान नष्ट करणे, हेच श्रीगुरुतत्त्वाचे प्रधान कार्य आहे. अज्ञानी जिवांना ज्ञान प्रदान करण्यासाठी भगवंतच श्रीदत्त प्रभूंच्या रूपाने योग्य वेळी प्रकट होतो आणि त्या जीवांवर कृपा करून त्यांना आत्मबोध करतो. या कार्यासाठी श्रीदत्तप्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्रीगुरु म्हणून पुन:पुन्हा अवतरित होत असतात. म्हणूनच भक्तांसाठी ‘दत्तजयंती’ हा केवळ श्रीदत्तगुरूंचा उत्सव नसून गुरुतत्त्वाचा उत्सव आहे. या भक्तीसत्संगाद्वारे दत्तरूपी गुरुतत्त्व अनुभवूया.
Sunday, December 01, 2024
जागतिक एड्स दिन
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस 'जागतिक एड्स दिन' म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स (AIDS - Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने (UNO) घोषित केले आहे. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांची संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला.
-
मित्राच्या केस मध्ये ही लक्षणे सत्य ठरले... लगेच उपचार मिळाल्यामुळे पुढील धोका टळला... आपला मेंदू हा असा अवयव आहे जो हृदयविकाराच्या ...
-
सुखाची अपेक्षा असेल.... तर दुःख ही भोगावे लागेल... प्रश्न विचारावयाचे असतील... तर उत्तर हि द्यावे लागेल...!! हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच...
-
अष्टविनायक दर्शन केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात . महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अष्टविनायक स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे आहेत. ही प्राचीन ...
धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार
आशा भोसले ज्येष्ठ पार्श्वगायिका
भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत...!! आशा भोसले यांसारखी बहुगुणी, अष्टपैलू गायिका पुन्हा होणे कठीणचं...!! आपल्या सदाबहार आवाज...





