★अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण ----
★एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.
★जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.
★ संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची
🎤 " ज्ञान विज्ञान कलेची
इथे जाहली मांदियाळी
कुलदिपक लावितो
विद्धेची ही नित्य दिवाळी "
🎤 " खूप काही बोलणार होतो
बोलता मात्र येणार नाही
शारदेच्या पूजनाच्या वेळी
बुद्धी माझी तोलणार नाही
★ ज्ञानाच्या लक्ष दिव्यांनी,
उजळले भाग्य सर्वांचे.
आराध्यदेवतेला/ज्ञानदेवतेला वंदन करून,
सुरुवात करतो कार्यक्रमाला
★ ज्योत तेवते समतेची... ज्योत तेवते त्यागाची... ज्योत तेवते क्रांतीची अन् समर्पणाची... या ज्योतीने एकच संदेश दिला आहे.... स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं.... आणि म्हणूनच या दिपाला म्हणजे दिव्याला साक्षी ठेवूनच आपण कार्यक्रम साजरा करणार आहे... म्हणून मी विनंती करतो, की मंचावरील सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करावे..।।