Saturday, April 29, 2023

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

 निरंतर माळेतून 

एक मोती गळतो आहे.. 

तारखांच्या जिन्यातून 

डिसेंबर पळतो आहे ..

    

 काही चेहरे वजा अन् 

बर्‍याच आठवणी जमा,

वयाचा पक्षी 

आभाळी दूर उडतो आहे..


हलकी हलकी उन्हे 

अन् आक्रसलेल्या रात्री, 

गेलेल्या क्षणांवर 

पडदा हळूहळू पडतो आहे.. 


मातीचा देह 

मातीत मिळण्यापूर्वी.. 

हर मुद्द्यावर 

इतका का आडतो आहे.. 


अनुभवण्या पूर्वीच 

सुटून जात आहे आयुष्य.. 

एक एक क्षण जणू 

ढग बनून उडतो आहे.. 


तारखांच्या जिन्यातून 

डिसेंबर पळतो आहे ..


तुमच्यासारखी माणसं भेटत गेली,मला आवडली

आणि मी ती जोडत गेलो!!

चला...

या वर्षाचा हा अखेरचा दिवस


तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल

खुप सारे धन्यवाद..!!


तुमच्या या मैत्रीची साथ 

यापुढे ही अशीच कायम असू द्या...

नव्या वर्षात नव्या उमेदीने

पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...