"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Tuesday, June 17, 2025

शैक्षणिक नवपर्वाची हार्दिक शुभेच्छा..

 

सन 2025-26 च्या शैक्षणिक नवपर्वाची हार्दिक शुभेच्छा...!!

      शैक्षणिक सत्र सुरू होत असुन शाळा पुन्हा नियमितपणे सुरू होत आहेत...!!

  शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासोबतच तुमचं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जाऊदेत! मेहनत, समर्पण आणि एकाग्रतेने तुमच्या ध्येयांची साधना करा...

  शिक्षण हे तुमचं सामर्थ्य आहे आणि ते तुम्हाला आयुष्यातील सर्वोत्तम संधी देईल.

"कठीण समयामुळेच महानता साधता येते" हे लक्षात ठेवा, आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी पुढे चला...!! 

 तुम्ही शक्य ते सर्व काही साधू शकता!

नवीन ज्ञानाच्या वाटेवर तुम्ही यशस्वी व्हाल अशी आशा आहे...!!

    उन्नती आणि उत्कर्षाचा विचार एकदा मनात आला की ध्येयाची बांधणी होते. ध्येयाला सातत्यपूर्ण कल्पक परिश्रमाची जोड मिळाली की, जीवनात भव्य यशाचा दिव्य सूर्योदय होतो. आडवे आलेच कधी निराशा आणि अपेक्षाभंगांचे  गतिरोधक तरी ते सहज पार करण्याच्या अंगवळणी पडलेल्या सवयीने-सहजतेने पार होऊन जातात. एकदा यशस्वीतेच्या अशा सात्विक आनंदाची गोडी निर्माण झाली की मग जीवनाच्या शाश्वत यशाचा राजमार्ग प्रशस्त होतो...

    शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सत्रातील नवपर्वाची सुरुवात पुन्हा एक नवं चैतन्य, एक नवी ऊर्जा, एक नवा उत्साह... यासह सुरु होईल.... शाळा किलबिलाटाने गजबजून जातील. काही रुसलेले, काही फुललेले, तितकेच निरागस आणि निष्पाप भावनेचे प्रतिबिंब असलेले चेहरे, ती अजाण बालकं, आपल्या ठायी नतमस्तक होऊन विद्याग्रहणात लिन होतील...!!

    अनेक प्रश्न, समस्या, अडचणींचे डोंगर प्रथम सत्रापासूनच आपणापुढे आहेत. त्यावर, अनंत गतिरोधक, खाचखळग्यांवर मात करून यशाचा सूर्योदय बघण्यासाठी तेजोमय भविष्याची एक छानशी सुरुवात सर्वांनी करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा...!!

No comments:

Post a Comment

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

Happy Hormones

चार संप्रेरके जी माणसाला‌ आनंदी ठेवतात. १. एंडॉर्फिन्स २. डोपामाईन ३. सेरोटोनिन ४. ऑक्सिटोसिन 🌸 आनंदी राहायचंय? मग ही ४ "Happy Hormone...