"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Saturday, September 23, 2023

मूलमंत्र यशस्वी जीवनाचा

    गाजर जबरदस्त आहे. आकर्षक आहे. पण मिळवणे कठीणच आहे.  यश  सहजा सहजी आयतं मिळण्यात मजाच नाही.  ध्येयावरील लक्ष विचलित झाल्यास दिशाभूल होईल. वाट चुकून भरकटायला होईल. दिशाभूल करायला प्रलोभने, व्यत्यय, वैचारिक विक्षेप, इत्यादी टपलेले असतातच. सदैव सावध राहिले पाहिजे. प्रयत्न मनाच्या सूक्ष्म पातळीवर करायचे आहेत. ध्येय नेहमी दृष्टिपथात, आठवणीने लक्षांत ठेवले पाहिजे.

     एवढ्या उच्चतम ध्येया पर्यंत आपली मजल जाईल का? असंख्य अडथळे येतील. आपली दमछाक तर होणार नाही ना? असे नकारात्मक विचार घोळवू  नका. मी साध्य करणारच. दमछाक होत असेल तर टप्प्या टप्प्याने थांबत थांबत जाईन. पण जाईनच. अडथले आलेच तर त्यावेळेस बघू. कांहीतरी मार्ग आयत्यावेळेस सापडेलच. असा सकारात्मक निश्चय करा. म्हणजे नेटाने प्रयत्न घडतील व शेवटी यशप्राप्ती होईल. यश प्राप्तीची वाट खडतरच असते. निसरडीच असते.

     प्रस्तुत जन्मात साध्य झालंच तर चांगलंच आहे. अन्यथा निदान प्रगतीला सुयोग्य दिशा तर मिळेल.दिशाहीन भरकटणार तर नाही. योग्य दिशेने प्रयत्न केल्यावर थोडी तरी प्रगती होईलच.                    

Friday, July 07, 2023

जय श्री राधे कृष्ण....

 

तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्या ही...

प्रेम त्याने राधेवर ही केले आणि अर्जुना वरही केले...राधा आपली नव्हती आणि होणार ही नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती आणि युद्धात अर्जुन जिंकून ही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती ..पण हे असूनही त्याने ही दोन्ही नाती अतिशय समरस होवून निभावली !! एकदा गोकुळ सोडल्यावर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही आणि राज्य अभिषेक झाल्यावर अर्जुनाच्या आयुष्यात ही तो परत कधीच आला नाही....अत्यंत उत्कटपणे नाती निभावून ही त्या नात्यातून तो अलगदपणे बाजूला झाला...परत कधीच परतून न येण्यासाठी  !! त्याची त्याला कधी खंत वाटली नाही ना कधी खेद झाला ...राधे बरोबर प्रेमाचे हळूवार नाते त्याने जपले यात त्याला लोक अपवाद आला तरीही त्याचे बासरीचे सुर कधी बहरले नाहीत असे कधीच झाले नाही !! ज्या उत्कटतेने त्याने राधे साठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळूवार अनुभव दिला तसाच अर्जुना बरोबर युद्ध करताना कुरुक्षेत्र आपल्या अफलातून डावपेच आणि कुट नीतीने गाजवले . राधे ला तो जीवन का आणि कसे जगायचे हे कोमल होवून सांगत असे त्याच आपुलकी ने अर्जुनला शत्रूस कसे आणि का संपवायचे हे ही ही सांगितले , एका पेक्षा एक अभेद्य , अमर आणि महावीर योद्धे त्याने लीलया वरती ढगात पाठवले जे त्याचे शत्रू नव्हते पण नाते जपताना त्याने तुझे माझे याचा त्याग केला होता....ज्या हळूवार पने त्याची बोटे बासरीवर फिरत असत त्याच हळूवार पने त्याची बोटे सुदर्शन चक्र ही चालवत असत....


हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्याने कधी सोडली नाही......कारण.....कारण तो कृष्ण होता ....संभवामी युगे युगे असे त्याचे स्वतः चे वचन आहे...तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता...आहे आणि राहील....गरज आहे आपल्या आयुष्यात असलेल्या त्या कृष्णाला ओळखण्याची..... 

Saturday, June 17, 2023

राजमाता जिजाऊ माॅ साहेब स्मृती दिन

१७ जून १६७४

" राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माॅ साहेब यांचा स्मृती दिनी " विनम्र अभिवादन..!!

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा

झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांनी "आऊसाहेब जिजाऊ" यांच किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या"पाचाड" या गावी निधन झालं. लाखो-करोडोंचा हा महाराष्ट्र दुखाच्या छायेखाली गेला. स्वराज्याची प्रेरणाच स्वराज्यातून निघून गेली. आमचा शिवबा पोरका झाला, आमचा बाळशंभू पोरका झाला, आमचा रायगड पोरका झाला, आमचा सह्याद्री पोरका झाला,

आणि आमचं"स्वराज्य"पोरकं झालं.

आधार गेला आमचा, आता उरला फक्त घनदाट अंधार……

याच"जिजाऊ"ज्यांच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती,

याच"जिजाऊ"ज्यांनी घडविले"राजे शिवछत्रपती".

जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नी शंभु छावा....!

जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा ....!

जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे ......!

जिजाऊ तुम्ही नसता तर दिसले नसते विजयाचे सोहळे ..... 

~~~~~~||~~~~~||~~~~||~~~~~~

 राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ दिनानिमित्त त्यांच्या प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचाराला त्रिवार अभिवादन.

  बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाच्या जडणघडणीचे श्रेय मा साहेब जिजाऊंना जाते

  मा.जिजाऊमुळेच शिवाजी महाराजांनी जातीभेदांची विषमतावादी, अमानवी निर्बंध दूर करून अठरा पगड जातींना सैन्यात दाखल करून घेतले.

  जनतेच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन पूणे शहराच्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवून पूणे राहण्यासाठी व वंशवृद्धी साठी अशूभ ठरवले असता मा.जिजाऊने लोकांनची भिती दूर करण्यासाठी नामी युक्ती म्हणून सोन्याचा नांगर फिरवला .हा विधी कोणत्याही ग्रंथात नव्हता.

   जिजाऊंच्या संस्कारामुळेच शिवाजी महाराजांनी कोणताही मूहूर्त पाहिला नाही.

   धर्मानुसार समूद्रपर्यटन निषिद्ध असले तरी महाराजांनी समुद्री आरमार उभारले.

   अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा स्वराज्याचा म्हणजेच समतेच्या व मानवतेच्या विरोधात असल्यामुळे त्याचाही शिरच्छेद केला.

   बहूसंख्य लोक केवळ आईच्या इच्छेखातर मनमारून व्रत,तीर्थ, उपासना,नवस ,कूंडली इ् कर्मकांड करीत असतात.कारण तसे संस्कार आईचे असतात.पण जिजाऊंनी शिवाजी महाराजांमध्ये प्रचंड बुद्धिप्रामाण्यवाद लहानपणा पासून पेरुन अंधश्रद्धेतुन बाहेर काढले.. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महान समतावादी, मानवतावादी राज्यकर्ते ठरले.

   अशा राजमाता जिजाऊंच्या क्रांतिकारी विचारांना मानाचा मुजरा.

Wednesday, May 31, 2023

आनंदी जीवनाचा कानमंत्र

 जीवनातील सर्वात मोठं अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचणं आहे... आणि यालाच सर्वात जास्त वेळ लागतो... लोकांमध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही असतात... आपण काय शोधायचं हे महत्त्वाचं आहे...

आळस हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं... परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते...!

 आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट

गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला

सुरवात केली की आपोआप आयुष्यात

चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.

चुका सुधारण्यासाठी ज्याची

स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही. 

खूप लोक आपल्याला ओळखतात.

*पण त्यातील मोजकेच लोक,

*आपल्याला समजून घेतात.

*दुसऱ्याला बदलण्याच्या प्रयत्न करण्यात,

*अपयश येईल.

*आधी स्वतःलाच बदला,

*मगच यश मिळेल.

*जिवनात खरं बोलून,

*मन दुखावलं तरी चालेल.

*पण खोटं हसून,

*खोटं बोलून,

*आनंद देण्याचा कोणालाही,

*कधीच प्रयत्न करू नका.

*कारण...

*त्यांचं आयुष्य असतं,

*फक्त तुमच्या सारख्या जवळच्या वाटणाऱ्या,

*माणसांच्या विश्वासांवर,

*म्हणून त्यांचा विश्वास घात,

*कधीही करू नका...!!

      *तारूण्य म्हणजे ज्वलंत धमन्याचं अविरत स्पंदन. निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर.  जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग.  निसर्गाच्या  साम्राज्यातील वसंत.  मनाच्या मयुराचा पुर्ण पसरलेला पिसारा. भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा.

*दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची

*माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे..

आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे.

*लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून...

काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य

Sunday, May 21, 2023


 समजुतदारपणाआणि शांतता हे 

वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर

अवलंबुन असतात.

     शुभ सकाळ

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

महाराष्ट्र दिन - हार्दिक शुभेच्छा! 🚩

🇮🇳  ✨"परिश्रमाच्या घामातून उभी राहिलेली समृद्ध महाराष्ट्राची ओळख… 🚩"महाराष्ट्र म्हणजे पराक्रम, संस्कृती आणि स्वाभिमान… ❤️ ...