Tuesday, December 24, 2024

मी देव पाहीला

 

     एका भयाण रात्री "मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक  साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा*अभ्यास करताना पाहिला.

*थंडीचे* दिवस होते. *कुडकुडत* होता पण वाचनात *मग्न* होता. 


हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. 

दिवसा कधी दिसत नसायचा. 

खुप *जिज्ञासा* होती त्या मुलां बद्दल जाणण्याची. 

एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. 

मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी *पार्सल* घेऊन जाऊ. 

         

*रात्रीचे साडेबारा* वाजले असतील. 

मी त्या मंदिराकडे आलो. 

तर तो *मुलगा* नेहमी प्रमाणे *मंदिराच्या पायरीवर* अभ्यास करत दिसला. 

मी *गाडी* थांबवली. त्याच्या जवळ गेलो.

मला बघून तो गालातल्या गालात  *हसला.* 

जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. 

मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? 

सर माझ्या *घरात लाईट* नाही. 

माझी *आई आजारी* असते. 

दिव्यात *रॉकेल* घालून अभ्यास  करायला. माझी *ऐपत* नाही.


बाळ तू मला बघून का *गोड हसलास* ? 


सर तुम्ही *देव* आहात !


नाही रे! 


सर तुम्ही माझ्या साठी *देवच* आहात. 


ते जाऊदे तू *जेवलास* का? 

मी तुझ्यासाठी *खाऊचं पार्सल* आणलं आहे. 


सर म्हणूनच मी *हसलो.* 

मला माहित होतं. 

तो ( देव ) कोणत्याही *रूपात* येइल पण मला *भुकेलेला नाही* ठेवणार. 

मी जेंव्हा जेंव्हा *भुकेलेला* असतो, तो काहींना काही मला *देतोच.* 

कधी *नवसाचे पेढे* तर कधी *फळ* तो मला देऊन जातो. 

आज मी *भुकेलेला* होतो पण *निश्चिंत* होतो. 

मला माहित होतं....तो काहीतरी कारण करून मला *भेटायला* येणार आणि *तुम्ही* आलात.

तुम्ही *देव* आहात ना !


मी *निःशब्द* झालो, नकळत माझ्या कडून *पुण्याचं* काम घडलं होतं. 

रोज *कर्जाच्या* ओझ्याखाली दबताना *देवाला* कोसत होतो. त्याने आज मला *देवाची उपाधी* देऊन लाजवलं होतं.


 त्याने तो अर्धवट *खाऊ* खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या *आईला* देऊन येतो.

माझे डोळे *तरळले.*

त्याला काही विचारण्या  अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. 

तो पाच मिनिटांनी परत आला. 

त्याच्या ओंजळीत *पारिजातकाची फुलं* होती. 

सर, 

माझी *आई* सांगते, ज्या *परमेश्वराने* आपल्या *पोटाची खळगी* भरली त्याच्या चरणी *ओंजळभर फुलं* तरी वहावीत.


क्षणभर *डोळे* बंद केले आणि त्या बंद दारातल्या *पाषाणाकडे* पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड *हसण्यासारखं* वाटलं. 


नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.

*शाळा, कॉलेज, मंदिर बंद* झाले. 

देवळं ओस पडली. देवळांना *कुलूप* ठोकली आणि रस्त्यावर  *शुकशुकाट* झाला.

असच एके दिवशी *त्या* मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या *देवळाकडे* डोकावलं.

रात्रीची वेळ होती.

देवळाची पायरीवरील *लाईट बंद* होती आणि तो *मुलगा* कुठेच दिसला नाही. 

वाईट वाटलं मला.  

या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?

काय खात असेल ?

कसा जगत असेल ?

असे *ना ना प्रश्न* आ वासून उभे राहिले. 


कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी *प्राण* गमावले. 

असाच आमचा एक मित्र *पॉजिटीव्ह* होऊन दगावला. 

मी त्याच्या *अंत्य संस्काराला स्मशानात* गेलो होतो. *अंत्यसत्कार* झाले.

सर्व आपल्या घरी निघाले. 

निघताना हात पाय धुवावे म्हणून *शंकराच्या* मंदिरा शेजारील *नळावर* गेलो. 

पाहतो तर तो मुलगा नळावर *स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे*  धुऊन त्या *स्मशानाच्या भिंतीवर* वाळत टाकत होता. 

मला बघून त्याने आवाज दिला, 

सर .... 


अरे तू *इथे* काय करतोस ? 

सर आता मी *इथेच राहतो.* 

आम्ही घर बदललं.

*भाडं* भरायला पैसे नव्हते. 

त्यातच लॉकडाऊन मध्ये *शिव* मंदिर बंद झालं आणि पायरी वरची *लाईटही* बंद झाली.

 

मग मला घेऊन आई इथे आली. 

काही झालं तरी *शिक्षण थांबता* कामा नये असं तिनं सांगितलं आहे. 

त्या *शिव* मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या *शव* मंदिराचे दरवाजे *कधी बंद होत* नाहीत. 

तिथे *जीवंत माणसं* यायची आणि *इथे मेलेली.* 

ह्या लाईट खाली माझा *अभ्यास* चालू असतो.

 

सर मी *हार* नाही मानली. 

*आई* सांगायची........

ज्याने *जन्म* दिला तोच *भुकेची खळगी* भरणार. 


बरं..... तुझी आई कुठे आहे ? 

सर ती *कोरोनाच्या आजारात *गेली.

तीन दिवस ताप खोकला होता. 

नंतर दम अडकला. 

मी कुठे गेलो नाही.  

इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी* दिला. 

१४ दिवस इथंच ह्या खोपीत *होम क्वाँरनटाईन* राहिलो.

*सरकारी कायदा मोडू* नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं *ती* सांगायची.

*आईच्या अस्थी* समोरच्या नदीत *विसर्जित* केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या *अग्नी* देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच *क्रियाकर्म* आटपलं. 

          

सर तरी मी हरलेलो* नाही पण दुःख एव्हढच आहे की मी *पास झालेलो पहायला आई* ह्या जगात *नाही.

ती जिथे ज्या जगात असेल तिथे *खुप खुश असेल हे माझं यश* बघून.  

कालच माझा *रिजल्ट* लागला आणि मी शाळेत *पहिला* आलोय. 

आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे *शिक्षक* करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय. 

*ऑनलाईन अभ्यास करायला माझ्या जवळ मोबाईल सुद्धा नाही. 


असो सर, 

तुम्ही का वाईट वाटून घेता ? 

तुम्हाला मी *पास* झाल्याचा *आनंद* नाही झाला ? 

सर, 

तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा. 


त्याने छोट्याशा *डब्यातून साखर* आणली होती.

चिमूटभर  माझ्या हातावर ठेवली. 

सर *तोंड गोड* करा. 


तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या *तोंडावर* त्या नळाचं पाणी मारून *भानावर* आलो.

*भरलेले डोळे* लपवण्यासाठी *तोंड धुतले.*

सर, मला माहीत होते, *देव* या जगात आहे आणि तो माझ्या *आनंदात माझी पाठ थोपटायला* नक्की येणार. 

त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या *खिशातला* माझा *नवा मोबाईल* त्या मुलाच्या *हातावर* टेकवला आणि त्याची *पाठ थोपटून* निमूटपणे *बाय* करून *स्मशानाबाहेर* चालू लागलो. 

आता दर महिन्याला *मी* त्याचा मोबाईल *रिचार्ज* करतो......

न सांगता. 


खरा देव तर कधीच नाही दिसला पण, 

मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. ....

 

देव पाहिला....


       🙏 धन्यवाद !! 🙏


हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं.. 

Saturday, December 14, 2024

दत्तजयंतीच्या शुभेच्छा...

  


 दत्तरूपी गुरुतत्त्वाचे महात्म्य 

   ‘दत्तजयंती’ म्हणजे त्रिदेवस्वरूप दत्तगुरूंचा अवतरणदिन ! शिष्याचे अज्ञान नष्ट करणे, हेच श्रीगुरुतत्त्वाचे प्रधान कार्य आहे. अज्ञानी जिवांना ज्ञान प्रदान करण्यासाठी भगवंतच श्रीदत्त प्रभूंच्या रूपाने योग्य वेळी प्रकट होतो आणि त्या जीवांवर कृपा करून त्यांना आत्मबोध करतो. या कार्यासाठी श्रीदत्तप्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्रीगुरु म्हणून पुन:पुन्हा अवतरित होत असतात. म्हणूनच भक्तांसाठी ‘दत्तजयंती’ हा केवळ श्रीदत्तगुरूंचा उत्सव नसून गुरुतत्त्वाचा उत्सव आहे.  या भक्तीसत्संगाद्वारे दत्तरूपी गुरुतत्त्व अनुभवूया.


Sunday, December 01, 2024

जागतिक एड्स दिन

 दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस 'जागतिक एड्स दिन' म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स (AIDS - Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने (UNO) घोषित केले आहे. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांची संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला. 

Friday, November 22, 2024

महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

 

२१ नोव्हेंबर, महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन

   महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी आपले रक्त सांडून आजच्याच दिवशी १९५६ साली महाराष्ट्र स्वतंत्र केला. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज या हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस. त्यांच्या कार्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्‍याचा दिवस. हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे तत्कालीन सरकारला संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीपुढे झुकावे लागले. या हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतर सरकारला अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागले. २१ नोव्हेंबर १९५६ ला फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. या निर्णया मुळे मराठी माणूस पेटून उठला होता. सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला जात होता. कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटन समोरील चौका कडे कूच करत होता. प्रचंड जनसमुदाय एका बाजुने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजुने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाऊंटनकडे निघाला. या मोर्चाला उधळून लावण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मात्र, अढळ सत्याग्रहींपुढे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात तीनशेहून अधिक आंदोलक जखमी झाले. १०६ जणांनी आपला प्राण गमवला. त्यानंतर या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेत १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर १९६५ मध्ये फ्लोरा फाऊंटन येथे हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र साठी ज्या १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता बलिदान केले त्या सर्वांना विनम्र अभिवादन.


Monday, November 11, 2024

National Education Day

  राष्ट्रीय शिक्षण दिन.. 

११ नोव्हेंबर-  स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री 

मौलाना अबुल कलाम आझाद


    यांच्या जयंती निमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून साजरा करतात. 

    शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन देशभरात त्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करतात. मौलाना अबुल कलाम आझाद हे एक स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. त्यांनी दिनांक १५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ या काळात शिक्षणमंत्री म्हणून देशाची सेवा केली. त्यांचा सन्मान करीत सन २००८ पासून देशात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जात आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. 

   देशात IIT, IISc आणि स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंग यासारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामागे त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. AICTE आणि UGC सारख्या सर्वोच्च संस्था स्थापन करणारे ते प्रमुख व्यक्ती होते. विनामूल्य प्राथमिक शिक्षण मिळावे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण प्रणालीची स्थापना केली. ललित कला अकॅडमी, साहित्य अकादमी आणि अश्या बर्‍याच शैक्षणिक संस्थांची त्यांनी स्थापना केली होती. व्यवसायिक प्रशिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाच्या विविधतेवरही त्यांनी भर दिला.

Monday, October 28, 2024

दीपावलीच्या शुभेच्छा...!!

  दीपस्य प्रकाश: न केवलं भवत:

गृहम् उज्ज्वालयतू जीवनम् अपि..!!

अमंगल दूर जाऊ दे

   नवा मार्ग दिसू दे...!!

प्रकाशाच्या या सणात,

तुमच्या प्रगतीचा दीप उजळू दे..!!


   ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!!


  धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!

   या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत..! 

हि दिपावली आपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो ह्याच दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!

 🙏🏻! शुभ दिपावली !🙏🏻

 :::::::🌹::::::🍥::::::🌹:::::::

       ❃ शुभेच्छुक ❃

 ✍सतिश बोरखडे, सचिव

महा. रा.प्राथ.शिक्षक संघ दारव्हा

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

  दीपावलीच्या मंगलमयी पर्वा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! 

  आपणास आरोग्य, धनसंपदा, ऐश्वर्य व कीर्ती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!!

~~~~~~~~

28 ऑक्टोबर पासून दीपावली ला सुरुवात होत आहे

◆सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....  !!!

२८ऑक्टोबर २०२४ वसुबारस !

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,

प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

   CLICK HEAR.  

~~~~~~~~

२९ ऑक्टोबर २०२४धनत्रयोदशी !

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !

Monday, October 21, 2024

भारतीय पोलीस स्मृती दिन

 

"२१ ऑक्टोबर" भारतीय पोलीस स्मृती दिन -

    अखंड देशासाठी त्यागाची भावना ठेवून कर्तव्यावर असलेले देशातील अनेक जवान शहिद होत असतात. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतात पोलीस हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा व पवित्र असा दिवस समजला जातो. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी पोलीस दलातील १० शिपाई लडाख हद्दीत भारत आणि तिबेट सिमेवर व १६ हजार फुट उंचीवर दोन हजार पाचशे मैलाच्या हॉटग्रीन या सिमेवर बर्फाच्छादीत अत्यंत निर्जन कडाक्याच्या थंडीत गस्त घालीत असताना धोकादायक पध्दतीने दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकाच्या हल्ल्यात शहिद झाले. या दिवसाची आठवण राहावी तसेच देशामध्ये आतंकी हल्ल्यात नक्षलवादी कार्यवाहीत, समाजकंटक व हिंसक कृत्ये करणाऱ्या कडून कर्तव्यावर असलेल्या शहीद जवानाच्या स्मृतीला उजाळा देण्यात येतो. आपल्या मातृभुमीचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्र निष्ठा ठेवून अनेक जवान शहीद होत असतात, तसेच पोलीसांना कायदा व सुव्यवस्थे बरोबर गुंड, अतिरेकी, दहशतवाद व समाजद्रोही लोकांचा सामना करावा लागतो.  त्यांना या दिवशी कृतज्ञतापर्णू स्मरण करण्यात येते, तसेच त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन अभिवादन करण्यात येत असते. या दिवशी त्यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. 

Friday, October 11, 2024

विजयादशमी: परंपरा आणि आधुनिकतेचा संगम

  • शस्त्रपूजन आणि सीमोल्लंघन: दसऱ्याचा पारंपरिक सोहळा..




  • विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध, सोन्यासह वाढू दे दसऱ्याचा आनंद

    💐💎💫💎💐

    विजयादशमी दसरा निमित्त मंगलमय शुभेच्छा

    उत्सव आला विजयाचा,

     दिवस सोनं लुटण्याचा,

     नवं जुनं विसरून सारे,

     फक्त आनंद वाटण्याचा,


     तोरणं बांधू दारी,

     घालू रांगोळी अंगणी,

     करू उधळण सोन्याची..

    जपू नाती मना मनांची...!!

    अधर्मावर धर्माने,अज्ञानावर ज्ञानाने, वैऱ्यावर प्रेमाने,शत्रूवर पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा शुभ दिवस म्हणजेच 'विजयादशमी' , दसरा...

    🚩 ♥️ 🚩

        प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य योध्याचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी.

       देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाला युद्ध करून संपविले ते याच दिवशी !

        विजयाची प्रेरणा घेवून शस्र आणि शास्त्राचे पूजन करून छात्रवृत्ती जागृत करून तमोगुण आणि वाईट प्रवृत्ती व शक्तींचा नाश करून 'दसरा' विजयादशमी सण साजरा करूया,,,!🙏

       झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा...!!

    🌹💐🙏💐🌹

    ❤️दसऱ्याचा हा शुभमुहूर्त

    तुमच्या व तुमच्या परिवाराच्या

    आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती भरो...! विजयादशमी व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा❤️  

        दसऱ्याचा हा सण तुमच्या जीवनात भक्ती, समर्पण आणि दृढनिश्चय घेऊन येवो हीच सदिच्छा. या पवित्र आणि शुभ प्रसंगी, मी तुम्हाला प्रतिष्ठा, सन्मान आणि यश मिळो अशी प्रार्थना करतो...!

    🚩 ♥️🚩

     ❃ शुभेच्छुक ❃

     ✍ सतिश बोरखडे, सचिव ✍

    महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक संघ

    ▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

    आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार, 

    मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,

    आनंदाच्या क्षणांना सर्वांचा आदर.

    तुम्हाला व तुमच्या परिवारातील सर्वांना माझा व माझ्या परिवाराकडून विजयादशमी व दसरा सणा निमित्त मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा... 

    Thursday, October 10, 2024

    Ratan Naval Tata


    रतन टाटा: एक दूरदर्शी नेतृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व


    रतन टाटा (Ratan Tata) हे नाव फक्त एका उद्योगपतीचं नाही, तर ते दूरदृष्टी (visionary), नेतृत्व (leadership) आणि आदर (respect) या शब्दांचं प्रतीक आहे. टाटा समूह (Tata Group) या जागतिक स्तरावरील उद्योग समूहाला त्यांनी नव्या उंचीवर नेलं.

    जीवनप्रवास आणि शिक्षण

    रतन टाटांचा जन्म (Ratan Tata's birth) २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून (Cornell University) आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं आणि नंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून (Harvard Business School) बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास केला. त्यांच्या या शिक्षणामुळे त्यांना जागतिक व्यापार आणि व्यवस्थापनाची उत्तम समज मिळाली.

    टाटा समूहाचे नेतृत्व

    जे. आर. डी. टाटा (J.R.D. Tata) यांच्यानंतर १९९१ मध्ये रतन टाटा (Ratan Tata) यांनी टाटा समूहाची धुरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा मोटर्स (Tata Motors), टाटा स्टील (Tata Steel) आणि टाटा टी (Tata Tea) यांसारख्या कंपन्यांनी जागतिक बाजारपेठेत (global market) आपली ओळख निर्माण केली. त्यांनी जॅग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) आणि कोरस (Corus) यांसारख्या मोठ्या कंपन्या विकत घेऊन टाटा समूहाचा विस्तार (expansion of Tata Group) केला.

    सामाजिक योगदान आणि परोपकार

    रतन टाटा (Ratan Tata) हे फक्त एक यशस्वी उद्योजकच नाहीत, तर एक मोठे समाजसेवक (philanthropist) देखील आहेत. टाटा ट्रस्टच्या (Tata Trust) माध्यमातून त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे.

    प्रेरणादायी विचार आणि नेतृत्व

    रतन टाटा यांचे विचार (Ratan Tata's quotes) अनेक तरुणांसाठी आणि व्यावसायिकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी नेहमीच नैतिक मूल्यांवर (ethical values) आणि सचोटीवर भर दिला. त्यांच्या मते, "यश मिळवण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे." टाटा नॅनो (Tata Nano) सारखी सर्वसामान्यांसाठी परवडणारी गाडी बनवण्याचं त्यांचं स्वप्न होतं, जे त्यांनी पूर्ण केलं.

    देव माणूस हारपला...!!

       शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढे आहे रतनजी टाटा या व्यक्तीचे देशासाठी योगदान...!

       अमाप पैसा असतांनाही संयम माणुसकी कशी असावी यांचे उत्तम उदाहरण म्हणजे रतनजी टाटा... खरे देशभक्त..!!

    खरा देशभक्त नि त्यागी

    असा दुसरा होणे नाही..!

    आकाशाचे पंख लावूनी

    पाय जमिनीवर राही...!!

    भारताचा रतन नव्हे 

    तू आहेस भारतरत्न...!!

       संपत्तीचा उपयोग कसा करावा हे रतनजी टाटाकडून शिकण्या सारखे होते. भारतीय उदयोग जगतांचे शिल्पकार रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली...!!

    अलविदा देश के "रतन... 

    याद करेगा "वतन...!!

    ~~~~~~~~

     ★ रतन नवल टाटा ★

    ◆जन्म - २८ डिसेंबर, १९३७ 
    ◆मृत्यू - ९ ऑक्टोबर, २०२४

        हे   एक भारतीय  उद्योगपती  आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते. १९९० ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते.

        निळ्या समुद्राबरोबरच त्यांना निळ्या आकाशाकडे तासन्‌तास पाहण्यात मौज वाटे किनाऱ्यावर भराऱ्या घेणारे सिंगल पक्षी पाहीले की आपल्यालाही या पक्षांप्रमाणे आकाशात भरारी मारता येईल का ? विमानात बसून कापसाच्या गाठीसारख्या ढगापलीकउचा चंद्र आपल्याला पाहता येईल का ? असे प्रश्न त्यांना पडायचे. पक्ष्यांप्रमाणे आपल्याला अवकाशात झेपावता येईल का ? असे स्वप्न उराशी बाळगून त्यांचे शिक्षण सुरु झाले.शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड होती. तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये बी एस्सी  झाल्यानंतर त्यांनी मुद्रास ऑफ टेक्‌नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला, प्रवेशासाठी लागणारे पैसेही नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेऊन डॉ. कलामांना पैसे दिले. या संस्थेतून त्यांनी एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केला. 

         पुढे अमेरिकेतील नासा या संस्थेत एरोस्पेस टेक्नॉ लॉजीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. मुळात चाणाक्ष, अभ्यासू व परिश्रमाची सवय असणाऱ्या कलाम याना अल्पावधीतच या विषयातील तंत्रज्ञान आत्म‌सात केले त्यानंतर त्यांचा १९५८ ते १० या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी अर्थात  DRDO शी संबंध आला.

    ~~~~~~~~

    ★अनमोल रत्न रतनजी टाटा★
    ●र*  त्न जे  अखिल विश्वाचे,
        सौभाग्य होते भारताचे ।
    ●त*  न, मन, धन अर्पिले,
     इच्छा...कल्याण व्हावे सार्‍यांचे ।।
    ●न*  वनवीन संकल्पना प्रत्येकाकडे, फक्त साकाराव्यात त्या कृतीने ।
    ●जी*  वन साधे तरी मौलिक,
      दाविले जगी टाटांनी कर्तृत्त्वाने ।।
    ●टा*  र्गेट ठेवून जिद्दीने उतरा,
      म्हणती...विश्वासाने व्यवसायात ।
    ●टा*  टा,अल्विदा म्हणू जरी आज, कायम स्थान राहिल मनामनांत ।।
    🌻 *भावपूर्ण श्रद्धांजली*🌻

    ~~~~~~~~

       टाटांचं मीठ खाल्लं नि त्यांची बाटाची चप्पल घातली इथून सामान्य माणूस त्यांच्याशी जोडला जातो! 

    Sunday, October 06, 2024

    देवीची साडेतीन शक्तिपीठे

    महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात.

     कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता ॥ 

    मातुः पुरुं द्वितीयंच रेणुकाधिष्ठितम्‌ ॥

     तुळजापूर तृतीयं स्यात्‌ सप्तशृंग तथैवच ॥ 

       या वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तिपीठ आहे दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर वणी गडावरची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते.

    सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाथ् साधिके

    शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते...

    ★पहिले शक्तीपीठ ★

    💎कोल्हापूरची महालक्ष्मी -

       कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. 

    करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही परब्रम्ह आदिशक्ती आहे. ती ना शिवपत्नी ना विष्णूपत्नी. ती साक्षात त्रिदेव-देवी व सर्व देवतांची आई आहे. 

    🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩

    कोल्हापूरची महालक्ष्मी सम्पूर्ण महत्वाची माहिती साठी क्लिक करा>>>

    🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩

    ★दुसरे शक्तीपीठ★

     🔵श्री.क्षेत्र माहूरची रेणुकामाता-

       ही देवी आदिशक्तीचे प्रकट रूप महाकाली म्हणून पूजली जाते. रेणुका देवीला "साऱ्या जगाची आई" अर्थात "जगदंबा" मानतात. रेणुका माता ही क्षत्रिय, ब्राह्मण, आदिवासी व पतीतांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पूजली जाते. 

    🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩

    माहूर गडची रेणुकामाता सम्पूर्ण महत्वाची माहिती साठी क्लिक करा>>>

    🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩

    ★तिसरे शक्तिपीठ ★

    🟢तुळजापूची श्री अंबाबाई -

     तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत.

      तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे.

    🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩

    तुळजापूची श्री अंबाबाई सम्पूर्ण महत्वाची माहिती साठी क्लिक करा>>>

    🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩

    ★ चौथे अर्धपीठ ★

    🔴वणीची श्री सप्तश्रृंगी -

     हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे.

    🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩

    वणीची श्री सप्तश्रृंगी सम्पूर्ण महत्वाची माहिती साठी क्लिक करा>>>

    🚩┈•✦✿✦•♥️•✦✿✦•┈🚩

    Saturday, October 05, 2024

    नवरात्र नव आवाहन

    उत्सव नवरात्रीचा, 
    उत्सव शक्तीचा, 
    उत्सव जागरूक हिंदू अस्मितेचा,

      दरवर्षी त्याच घटरूपी शरीरातील भावना बदलू शकतात. जसं पेरावं तसं उगवतं ना? चला आपण स्वतः मधील दैवी अंंशाला नव्यानी ओळखुया, जागवुया आणि पुजुया.

    🚩♥️🚩

    🔹पहिली माळ -

    आधी आत्मा! पहिल्या दिवशी छान नाहुन माखून, खुषीने जे आवडेल ते लेवून, जे आवडेल तेच करावं. करण्याआधी मनाला एक प्रश्न मात्र विचारायचा आहे, मी हे का करते आहे? मला आवडतय म्हणुन? का जग करतय म्हणुन ? मला करून बघायचय म्हणून? आजचा दिवस तुमचा असावा, जगाची नक्कल करण्याचा नाही. तुम्ही स्वतःशी बसून स्वतःला विचारायचं आहे की,  तुम्ही जगापेक्षा वेगळ्या का आहात? मग तेच करा. कुणी छान स्वयंपाक करेल, कुणी पेंटिग, कुणी छान नटेल, कुणी देवासमोर बसुन मनोभावे पूजा करेल, कुणी तरी कुणाला तरी माफ करेल किंवा माफी मागुन स्वत:च मन मोकळं करेल. मनातलं स्वत:ला आवडणारच फक्त करून संध्याकाळी छान आरती करा. दिव्यात समाधानानं उजळणारा तुमचा चेहरा बघून ती देवी आई नक्की सुखावणार.

    🚩♥️🚩

    🔹माळ दुसरी -

        तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रायोरिटीज काळानी जरूर बदलणार, पण तरीही अत्यंत महत्वाची असणारी माणसं तिच रहाणार. आज त्यांच्याकडे पुर्ण लक्ष द्यायचं, सांगुन सवरून बरका. त्यांच्या आवडीचं काही शिजवा, त्यांना भेट आणा, ओवाळून हातात द्या आणि त्यांच्या पर्यंत हे जरूर पोचवा कि तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. आपण सेल्फी टाकताना इतर दिवशी लाजत नाही, ना नवरात्रीचे रंग पाळताना. मग आपल्याच माणसांवरतं प्रेम (जग) जाहिर करायची कसली लाज? विश्वास ठेवा. फार मोठी ताकद मिळते. इडापिडा टळते, एकी वाढते. कुठल्या मातेला आपल्या लेकरांना समाधानी बघुन आनंद नाही बरं होणार?

    Thursday, October 03, 2024

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान

     लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

    धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

    एवढ्या जगात माय मानतो मराठी...

    ~~~~~~~~

    3 ऑक्टोंब मराठी अभिजात भाषा गौरव दिन...

    मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा...

    मिळाली महाराष्ट्राला नवीन ऊर्जा...!!

    आहेच दर्जेदार भाषा मराठी

    घडविले तिने थोर महात्मे, संत, गुणवंत, विचारवंत...

    वाटतो आम्हा तिचा अभिमान, वाढवा आता पुन्हा तिची शान, वाढेल आणखी तिचा मान..!!

    बोलू मराठी, लिहू मराठी, गाऊ मराठी ,काहीही तिच्या साठी,

    आहे आम्हा अभिमान...!!

    भागेल भूक, तहान, वाढेल जगात तिची शान..!!


        पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने मराठी भाषेला 3 ऑक्टोंबर 2024 ला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला, 

    ~~~~~~~~


    ★मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला >>>

       महाराष्ट्रातील १२ कोटी मराठी भाषिकांचे स्वप्न पूर्ण झाले विविध सामाजिक सांस्कृतिक लेखक कवी साहित्यकार यांच्या लढयांना यश मिळाले. व अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला केंद्र व राज्य सरकार यांचे जाहीर आभार.

       माय मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी प्रेमीजनांचे खूप खूप अभिनंदन...!!

              🌹💐🌹💐🌹

      मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे काही महत्त्वाचे परिणाम होऊ शकतात:-

    विनायक दामोदर सावरकर

    भारतीय थोर क्रांतिकारक, राजकारणी, वकील, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक  

       ★ विनायक दामोदर सावरकर

        ━═•●◆●★●◆●•═━

    ●जन्म :~ २८ मे १८८३ 

    भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र,

    ●मृत्यू :~ २६ फेब्रुवारी १९६६

    दादर,मुंबई,महाराष्ट्र,भारत

    ●चळवळ:~ भारतीय स्वातंत्र्यलढा

    ●संघटना:~ अभिनव भारत

    अखिल भारतीय हिंदू महासभा

    ●प्रमुख स्मारके :~ मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमानधर्म:हिंदू


     ★ विनायक दामोदर सावरकर ★

         हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी  कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक  चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी,  हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ,  विज्ञानाचा  पुरस्कार व जातिभेदाला  तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक,  भाषाशुद्धी व लिपिशुद्धीह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत  साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

    वाचन प्रेरणा दिन... 15 आॕक्टोबर

     भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती   निमित्ताने 15 ऑक्टोबर 2018 पासून हा दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा होत आहे.

       ★डॉ.अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम★

       भारताचे मिसाईल मॅन, बुद्धिमान, ज्ञानी, नि:स्वार्थी आणि सर्वांचा प्रिय असा नेता जगाने पाहणे खरोखरच दुर्मिळ आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, एरोस्पेस आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशात क्रांती घडवून आणणारी व्यक्ती म्हणजे डॉ. अब्दुल कलाम. भारताची अणुचाचणी दोनदा पाहणारी व्यक्ती होती. डीआरडीओ आणि इस्रोच्या प्रगतीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

      विज्ञानाचा परम भोक्ता असणारे वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०), भारतरत्‍न (१९९७). राष्ट्रपती होण्यापुर्वी ’भारतरत्‍न’ हा भारताचा सर्वोच्‍च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत.

      आदरणीय डॉ. अब्दूल कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत.

    धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

    श्रीकृष्ण जन्माष्टमी

      उत्सव, परंपरा आणि गोपाळकाला! जन्माष्टमी: गोपाळकाल्याचा गोडवा आणि दहीहंडीचा थरार.. ★श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला-    श्रीकृष्ण जन्माष्टमी हा...