Wednesday, May 31, 2023

आनंदी जीवनाचा कानमंत्र

 जीवनातील सर्वात मोठं अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचणं आहे... आणि यालाच सर्वात जास्त वेळ लागतो... लोकांमध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही असतात... आपण काय शोधायचं हे महत्त्वाचं आहे...

आळस हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं... परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते...!

 आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट

गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला

सुरवात केली की आपोआप आयुष्यात

चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.

चुका सुधारण्यासाठी ज्याची

स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही. 

खूप लोक आपल्याला ओळखतात.

*पण त्यातील मोजकेच लोक,

*आपल्याला समजून घेतात.

*दुसऱ्याला बदलण्याच्या प्रयत्न करण्यात,

*अपयश येईल.

*आधी स्वतःलाच बदला,

*मगच यश मिळेल.

*जिवनात खरं बोलून,

*मन दुखावलं तरी चालेल.

*पण खोटं हसून,

*खोटं बोलून,

*आनंद देण्याचा कोणालाही,

*कधीच प्रयत्न करू नका.

*कारण...

*त्यांचं आयुष्य असतं,

*फक्त तुमच्या सारख्या जवळच्या वाटणाऱ्या,

*माणसांच्या विश्वासांवर,

*म्हणून त्यांचा विश्वास घात,

*कधीही करू नका...!!

      *तारूण्य म्हणजे ज्वलंत धमन्याचं अविरत स्पंदन. निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर.  जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग.  निसर्गाच्या  साम्राज्यातील वसंत.  मनाच्या मयुराचा पुर्ण पसरलेला पिसारा. भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा.

*दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची

*माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे..

आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे.

*लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून...

काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य

Sunday, May 21, 2023


 समजुतदारपणाआणि शांतता हे 

वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर

अवलंबुन असतात.

     शुभ सकाळ

Tuesday, May 16, 2023

मायकल जॅक्सन

 मृत्यू - एक अटळ सत्य, पैशाच्या बळावर निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका....!!

   मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं. तो कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा (mask) घालत असे.

       त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी सर्व बाबतीतील निष्णात १२ डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज सर्व प्रकारची तपासणी करीत असत. 

   त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे. माझ्या मते नैसर्गिक व सकाळ-रात्रीचे भोजन हे वेळेतच व सात्विक पद्धतीचे घ्यायला हवेत. त्यात फळे भाज्या, तळीव पदार्थांपेक्षा भाजलेले पदार्थ खावेत. जसे की लसूण फ्राय पेक्षा तव्यावर भाजलेला लसूण खावा.... मायकलकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे. 

       मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने सण १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्‍या आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं ते ही गोर्‍या मुलींबरोबर. 

         दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील. 

       त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि २५ जून २००९ या दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी १२ डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही. 

     आनंदात रहा, दुसर्‍याला पण आनंद वाटा आणि आनंदाने जगू  द्या. आणि चुकूनही पैशाचा माज चढवून निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करू नका..

       त्याने २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 

        जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते. प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज antibiotics ची अनेक injections घ्यावी लागत असे. 

       मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे. 

     मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच २५ जून २००९ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं instant messenger हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं. 

     मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो, त्यांना मृत्यूच चकवतो, हेच खरं... चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज.. कशाला तो ! स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच असणार आहे. हे कधी समजणार लोकांना ! कदाचित कधीच नाही.

म्हणूनच सिकंदरन सांगितले  होते, मी  मरताना माझे  दोन्ही  हात  मोकळे ठेवा, जगाला  दिसावेत मी रिकाम्या हाताने जात  आहे. हेच  जीवनाचे  सत्य  आहे. 

Monday, May 15, 2023

कठोर परिश्रम करा यश तुमचे जवळ राहील....

दिवस चांगले असतील तर न बोलावताही गाव गोळा होईल.

     आपण कोणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाची असते ती समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असलेली गरज... गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा  कांही लोकांचा स्वभावच असतो.  गरज संपली की नातं संपलं, प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला कधीच किंमत देत नसतात...!!

    एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं पण जगायला शिका, जर तुमचे दिवस चांगले असतील तर न बोलावता ही गाव गोळा होईल पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा कोणी येणार नाही....

     मनुष्याच्या दुःखाचे कारण त्याचे दुःख नसून त्याने केलेली सुखाची अपेक्षा असते...! आयुष्यात फक्त professionally जगू नका... कधी कधी Emotionally पण जगा... कारण professionally माणसं फक्त जवळ येतात. आणि Emotionally माणसं जोडली जातात....

     प्रत्येक समस्येवर कांही ना कांही मार्ग असतोच फक्त त्यासाठी विचार शांततेने करावा लागतो".

   प्रवास हा दुःखांचा असतो ज्यामध्ये सुखाचे क्षण प्रवासी म्हणून येतात आणि जातात...!

    इतरांच्या सल्ल्यापेक्षा आपलं मत जास्त महत्त्वाचं  असतं...!

      आनंद हा फक्त पैशाचा वारसदार नसतो... कधी कधी गरीबाच्या घरातलाही तो हक्काचा पाहुणा असतो...!    आयुष्यात आपल्याला काही मिळवायचे असेल तर नम्र व लिन असण्याबरोबर अडकाठी करणाऱ्या कडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते... जसे विहीर खणताना आवाढव्य दगडांना दुर्लक्षित करून सर्वांचे लक्ष त्याखाली खळखळणाऱ्या पाण्याच्या झऱ्याकडेच असते... आणि त्याच विहिरीतून पाणी काढताना बादलीला झुकावे लागते तेंव्हाच मधुर पाणी त्यात मिळते...!!!

     नको त्या गोष्टीला जास्त मोल दिलं की आयुष्याचा तोल साधणं कठीण बनतं. मनाचा व्यवहार जपणारा धनाचा हिशोब ठेवत नाही...!"मनाला चांगल्या विचारायचं कव्हर असेल तर 

◆ माणूस नावाचं पुस्तक

नेहमी चांगलंच दिसतं"

    सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं, ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं. अगदी उगवत्या सूर्यासारखं...!

     प्रेम करणारी माणसं या जगात भेटतच असतात फक्त समजून घेणारी व समजावून सांगणारी माणसं भेटायला भाग्य लागते.

 जे साधं आणि सोप असतं तेच अतिशय छान असतं मग ते जगणं असो की वागणं._

   आनंद वाटणाऱ्याच्या ओंजळी कधीच रिकाम्या नसतात कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान निसर्गाकडून मिळालेलं असतं.

खर्च झाल्याचे दुःख नसतं... हिशोब नाही लागला की वाईट वाटतं._

 देण्याची सवय लावून घ्या मग येणं आपोआप सुरू होईल... मग तो मान असो, प्रेम असो, की वेळ..

एकटा असण्याचं एक बरं असतं... ना कोणी सोडून जाण्याची भीती ना कोणी येईल याची आशा...!!

 ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि जे होतं ते ठरवलेलं असतं असं नाही... यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.आपल्याला तेच लोक बुडवतात ज्यांना आपण पोहायला शिकवलेलं असतो...!! कठोर परिश्रम करा यश ऐके  दिवशी तुमच्या पायाचे चुंबन घेण्यासाठी येईल !

आत्मपरीक्षण

यशस्वी होण्यासाठी स्वतः च आत्मपरीक्षण...!!


    स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करु द्या.. काहीही फरक पडत नाही...!

    पैसे नसल्यामुळे साधे राहण्यात आणि पैसे असून साधे राहण्यात खूप फरक आहे...!

    दुसऱ्याचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतः च आत्मपरीक्षण केलेलं कधीही चांगलं...!


यशस्वी होण्यासाठी स्वतः च आत्मपरीक्षण...!!

यशस्वी होण्यासाठी आत्मपरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आत्मपरीक्षणामुळे आपल्याला आपल्या योग्यतांचा आणि अपयशांचा नुसता अंदाज लागत नाही, तर आपले उद्दिष्ट, कार्यशक्ती आणि प्रेरणा देखील अधिक स्पष्ट होतात.
★यशाच्या मार्गावर जाण्यासाठी काही महत्वाचे उपाय-

◆स्वत:ला ओळखा: आत्मपरीक्षण करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे स्वत:ला समजून घेणे. तुमच्या ताकदी, दुर्बलता, आवडीनिवडी आणि मूल्यांना समजून घ्या. यामुळे तुम्ही तुमच्या गंतव्याप्रति ठरवलेला मार्ग अधिक चांगल्या प्रकारे आखू शकाल.

◆ध्येय निश्चित करा: यश मिळवण्यासाठी स्पष्ट आणि प्रभावी ध्येय ठरवणे गरजेचे आहे. तुमचं ध्येय सुस्पष्ट असायला हवं आणि त्यासाठी ठराविक रणनीती असणे आवश्यक आहे. ध्येय आपल्याला प्रेरणा आणि दिशा देते.

◆स्वत:ची मूल्यांकन करा: काय चांगलं केलं आणि काय सुधारण्याची आवश्यकता आहे, यावर विचार करा. तुमच्या कार्यामध्ये काय कमी आहे, कुठे सुधारणा करता येईल, याचा विचार करा.

◆वेळ व्यवस्थापन: आपले वेळ व्यवस्थापन योग्य असावे लागते. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक मिनिटाचा योग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. योग्य वेळापत्रक ठरवा आणि त्यानुसार काम करा.

◆प्रेरणा आणि समर्पण: यश मिळवण्यासाठी सतत प्रेरित राहणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचं ध्येय तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुम्हाला कुठेही थांबण्याची इच्छा होणार नाही. समर्पण असावं आणि कठोर परिश्रम करावेत.

◆सकारात्मकता आणि आत्मविश्वास: आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हे यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सगळी संकटं आणि अडचणी येत असतानाही, आपल्यावर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

◆शिकणे आणि सुधारणा: यशस्वी होण्यासाठी सतत शिकणं आवश्यक आहे. नवा विचार, कौशल्यं आणि दृष्टिकोन शिकण्याची प्रक्रिया चालू ठेवा. कोणतंही अपयश एक शिकवण आहे, त्यातून शिकून पुढे जा.

◆तणाव व्यवस्थापन: यशाच्या मार्गात अनेक तणाव येऊ शकतात. त्यांचा सामना कसा करावा, हे शिकून घ्या. तणाव कमी करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक व्यायाम करा.

      तुम्ही तुमच्या जीवनात आत्मपरीक्षण करत राहिल्यास, तुमचं यश तुमच्या हाती असणार आहे.

Sunday, May 14, 2023

सांजधारा

   अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान, आणि वैर भावना, माणसाला अनेकदा हरवते ! हे ज्यांना समजत नाही ! त्यांना आपण कशाने हरलो, हे आयुष्यभर उमगत नाही..!!

   ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते, म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो.

Wednesday, May 10, 2023

 

🐾जज्बात वहा ही जाहिर करो, 

जहा उसकी कद्र हो...!!                     

बाकी तो आंखो से बहता हुआ आंसु भी, 

लोगो को पानी लगता है..🐾

Tuesday, May 09, 2023

जीवनदर्शन

बसच्या प्रवासात अगदी मागच्या सीटवर बसलो तर जास्त धक्के लागतात.

       जशी जशी पुढची जागा मिळेल तसे तसे धक्के कमी कमी बसतात.
      ड्रायव्हर व आपली सीट यात अंतर जास्त तर धक्के जास्त,आणि अंतर कमी तर धक्के कमी.

       आपल्या जीवनाच्या गाडीचा ड्रायव्हर "परमेश्वर" आहे. त्याच्यात व आपल्यात अंतर जास्त असेल तर जीवना च्या प्रवासात धक्के जास्त बसतील.
      अंतर कमी झाले तर धक्के कमी. 

Monday, May 08, 2023


 जीवन आहे खरी कसोटी

  मागे वळून पाहू नका.

   येईल तारावयास कोणी

   वाट कुणाची पाहू नका..

  यश तुमच्याजवळ आहे.

जिंकल्याशिवाय राहू नका..


 सब दुःख दूर होने के
    बाद मन प्रस्सन होगा
  ये आपका भ्रम है..!
   मन प्रस्सन रखो
सब दुःख दूर हो जायेंगे
    ये हकीकत है... !!

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर...

सुखाची अपेक्षा असेल....

तर दुःख ही भोगावे लागेल...

प्रश्न विचारावयाचे असतील...

तर उत्तर हि द्यावे लागेल...!!


हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच

लावता येत नाही जगात...

जीवनात यश हवे असेल....

तर संकटांना सामोरे जावेच  लागेल...!!

~~●~~~~●~~

यश प्राप्त करण्यासाठी भावनिक प्रेरणा खूप महत्त्वाची असते, कारण मानसिक आणि भावनिक दृढता आपल्याला कोणत्याही अडचणींवर मात करण्यात मदत करते. काही गोष्टी आपल्याला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही.. फक्त स्वतःवर आत्मविश्वास आपण ठेवणे आवश्यक आहे.

१. प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाहीत- (Effort is Never Wasted)

जितके आपण प्रयत्न करतो, तितके आपले अनुभव आणि शिकवण वाढत जातात. यश कधीही एकाच ठिकाणी थांबत नाही; प्रत्येक छोटा प्रयत्न काहीतरी शिकवतो, जो पुढच्या यशासाठी उपयोगी ठरतो.

"प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाही, प्रत्येक अयशातून शिकण्यासारखे काहीतरी असते ..
२. अपयश हे यशाकडे जाण्याचा एक भाग आहे- (Failure is Part of the Journey)

यशाच्या मार्गावर अपयश येणं हे अगदी सामान्य आहे. हे आपल्याला शिकवते, आणि अधिक मजबूत बनवते. अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी आपल्या अपयशावर मात करून यश प्राप्त केले आहे.

"यश मिळवण्यासाठी अपयशातूनच मार्गदर्शन प्रेरणा मिळते."

३. दृष्टीकोन (Perspective) महत्त्वाचा आहे-

सकारात्मक दृष्टीकोन ठेवूनच यश प्राप्त करता येते. जरी अडचणी दिसत असल्या तरी त्यांना एक वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. हेच तुम्हाला मानसिक धैर्य देईल आणि यशाकडे पावले टाकण्यास मदत करेल.

"तुम्ही जे पाहता, त्यापेक्षा अधिक आहे."

४. संघर्षाचे मूल्य- (The Value of Struggle)

संघर्ष आणि आव्हाने हे यशाच्या प्रवासात महत्वाचे टप्पे आहेत. आपला संघर्ष आपल्याला आपले उद्दिष्ट स्पष्ट करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला अधिक कठोर बनवू शकतो.

"ज्यांना संघर्ष सहन करण्याची क्षमता आहे, त्यांनाच यश मिळते."

५. दुसऱ्यांचे समर्थन- (Support of Others)

आपल्याला कधीही एकटे चालावे लागत नाही. मित्र, कुटुंब, किंवा सहकारी यांचे समर्थन आणि प्रेम हे आपल्याला यशाच्या मार्गावर पावले टाकायला मदत करू शकते.

"एकटं चालणं कठीण असू शकतं, पण जेव्हा आपण एकत्र असतो, तेव्हा आपल्याला अधिक सामर्थ्य मिळते."

६. स्वतःवर विश्वास ठेवा- (Believe in Yourself)

आत्मविश्वास असला, तर यश कधीच दूर नाही. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि इतरांच्या नकारात्मक मतांकडे दुर्लक्ष करा.

"जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने असते."

७. यश प्राप्तीचा मार्ग कठीण असतो- (Growth is Hard)

यश मिळवताना आपल्याला अनेकदा झुंज देणारी परिस्थिती येते. परंतु हेच आपल्याला अधिक शिकवते आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व तयार करते.

"प्रत्येक वाढलेला टाकलेला गडबड आणि हरवलेले क्षण आपल्याला कधीच परत मिळत नाहीत."

८. लहान प्रगती देखील मोठं यश आहे- (Small Progress is Big Progress)

यश मिळवताना लहान-लहान विजय सुद्धा महत्त्वाचे असतात. अगदी थोडे थोडे प्रगतीचे टप्पे आपल्याला मुख्य ध्येयापर्यंत घेऊन जातात.

"प्रत्येक लहान विजय सुद्धा तुमच्या मोठ्या यशाची पायवाट ठरतो."

९. जीवनाचा एक ध्येय ठरवा- (Set a Clear Goal)

ध्येय ठरवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. ध्येय असताना, त्याकडे जाणारे मार्ग आणि त्या मार्गावर लागणारी ऊर्जा आपल्याला कधीच कमी पडत नाही.

"ध्येय निश्चित करा, मग तुमचं धैर्य आणि कठोर परिश्रम तुम्हाला त्यापर्यंत पोहोचवतील."

१०. कधीही हार मानू नका- (Never Give Up)

यश कधीच एका क्षणात मिळत नाही. धीर, समर्पण आणि चुकांवर मात करून, त्यातून शिकत जाऊन यशाकडे वाटचाल करत राहा.

"यश तोच मिळवतो, जो कधीही हार मानत नाही."

हे सर्व विचार एकत्र ठेवून तुम्ही यशाच्या मार्गावर सकारात्मक आणि मानसिक दृढतेने पाऊले टाकू शकता. या प्रेरणांनी तुमचं मन आणि आत्मविश्वास अधिक मजबूत होईल, आणि तुमचा यशाचा प्रवास अधिक सोपा आणि उद्दिष्टपूर्ण होईल.


Saturday, May 06, 2023

नीट परीक्षेकरता विद्यार्थ्यांन करिता महत्त्वाच्या सूचना...

परीक्षेकरिता महत्त्वाच्या सूचना

1】 नीट ऍडमिट कार्ड च्या दोन कलर कॉपी सोबत ठेवा.

2】 ऍडमिट कार्ड सोबतच्या सर्व सूचना व्यवस्थित वाचा.

3】 एडमिट कार्ड पेज नंबर एक सेंटर डिटेल्स व सेल्फ डिक्लेरेशनसं बंधित आहे 

4 】पेज नंबर 2 पोस्टकार्ड साईज ४×६ फोटो हा पांढऱ्या बॅकग्राऊंड मधील चिकटवणे साठी आहे.

5】 पेज नंबर 3 उमेदवारासाठी सूचना आहेत.

6 】पेज नंबर 1 सेंटर डिटेल्स व सेल्फ डिक्लेरेशन अंडर रायटिंग, पोस्टकार्डसा इज फोटोग्राफ चिकटवूनप रीक्षकाकडे द्या.

         चार बाय सहा च्या एकूण तीन फोटोकॉपिज पैकी दोन फोटोकॉपिज स्वतःजवळ ठेवा. आपल्या स्वतः च्या भविष्यातील वापरा करिताची कॉपी सेंटर वरती नेण्याची आवश्यकता नाही.

7 】फोटोच्या डाव्या बाजूस फोटोवरती व बाहेर तुमची सही असली पाहिजे डाव्या हाताचा अंगठा सुस्पष्ट असावा डार्क  किंवा अंगठा पसरलेला असू नये.

 पोस्टकार्ड साइज फोटो व सही ही तुमचे एडमिट कार्ड वरील फोटो व सहीशी मिळतीजुळती असली पाहिजे पेज नंबर 2 मधील पोस्टकर्ड साइज फोटो चिकटवून न नेलेस परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

श्रीकृष्ण जन्माष्टमी

  उत्सव, परंपरा आणि गोपाळकाला! जन्माष्टमी: गोपाळकाल्याचा गोडवा आणि दहीहंडीचा थरार.. ★श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला-    श्रीकृष्ण जन्माष्टमी हा...