Saturday, May 6, 2023

नीट परीक्षेकरता विद्यार्थ्यांन करिता महत्त्वाच्या सूचना...

परीक्षेकरिता महत्त्वाच्या सूचना

1】 नीट ऍडमिट कार्ड च्या दोन कलर कॉपी सोबत ठेवा.

2】 ऍडमिट कार्ड सोबतच्या सर्व सूचना व्यवस्थित वाचा.

3】 एडमिट कार्ड पेज नंबर एक सेंटर डिटेल्स व सेल्फ डिक्लेरेशनसं बंधित आहे 

4 】पेज नंबर 2 पोस्टकार्ड साईज ४×६ फोटो हा पांढऱ्या बॅकग्राऊंड मधील चिकटवणे साठी आहे.

5】 पेज नंबर 3 उमेदवारासाठी सूचना आहेत.

6 】पेज नंबर 1 सेंटर डिटेल्स व सेल्फ डिक्लेरेशन अंडर रायटिंग, पोस्टकार्डसा इज फोटोग्राफ चिकटवूनप रीक्षकाकडे द्या.

         चार बाय सहा च्या एकूण तीन फोटोकॉपिज पैकी दोन फोटोकॉपिज स्वतःजवळ ठेवा. आपल्या स्वतः च्या भविष्यातील वापरा करिताची कॉपी सेंटर वरती नेण्याची आवश्यकता नाही.

7 】फोटोच्या डाव्या बाजूस फोटोवरती व बाहेर तुमची सही असली पाहिजे डाव्या हाताचा अंगठा सुस्पष्ट असावा डार्क  किंवा अंगठा पसरलेला असू नये.

 पोस्टकार्ड साइज फोटो व सही ही तुमचे एडमिट कार्ड वरील फोटो व सहीशी मिळतीजुळती असली पाहिजे पेज नंबर 2 मधील पोस्टकर्ड साइज फोटो चिकटवून न नेलेस परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

8】 दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांनी यावे दीड वाजता गेट बंद झाल्यावर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. 

9 】फोटोआयडी पुरावा म्हणून ओरिजनल  बोर्ड रिसिप्ट ,आधार पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधार, रेशन कार्ड, आधार एनरोलमेंट फोटो यापैकी एक सोबत आणावे इतर कोणतेही फोटो पुरावे किंवा सत्यप्रत किंवा मोबाईल मधील कॉपी बिलकुल ग्राह्य धरली जाणार नाही.

10】 परीक्षा झाल्यावर दोन्ही ओ एम आर शीट परीक्षकाकडे द्याव्यात फक्त बुकलेट तेवढीच विद्यार्थ्यांनी घरी आणायची आहे.

   परीक्षक सांगत नाहीत तो पर्यंत

कोणत्याही  परिस्थितीत बुकलेट ओएमआर उत्तरपत्रिका स्वतंत्र करू नये. 

11】 परीक्षकांच्या विशेष परवानगीशिवाय आपली सीट सोडू नये आपली उत्तरपत्रिका परीक्षाकाकडे दिल्याशिवाय व हजेरी पत्रकावर सही केल्याशिवाय बाहेर येऊ नये.

     हजेरी पत्रकावर एकूण दोन वेळा सही घेतली जाणार असून त्याशिवाय उत्तर पत्रिका परीक्षाकाकडे देऊ नये.

12】 बायोमेट्रिक हजेरी अत्यावश्यक आहे.

 बायोमेट्रिक हजेरी झाल्यावरच विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्डवर होलोग्राम लावण्याचा आहे.

 एडमिट कार्ड वरती जर विद्यार्थ्याने होलोग्राम लावला नाहीतर परीक्षा झाल्यावर बायोमेट्रिक ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्याची आहे.

13】 विद्यार्थी आपल्या सोबत पुढील वस्तू नेऊ शकतात-

◆ पारदर्शक पाण्याची बाटली 

◆ हजेरी पत्रकावर चिटकवण्यासाठी जास्तीचा यापूर्वी एप्लीकेशनचे वेळी अपलोड केलेला फोटो.

◆  50 मिली सॅनिटायझर बॉटल 4 एडमिट कार्ड वरती लावलेला चार बाय सहाचा फोटो जाहीरनामा पत्र.

◆ सेंटरवर येण्यापूर्वी उमेदवारांनी सुस्पष्ट हस्ताक्षरात अंडरटेकिंग लिहून आणावे.

14】 अपंग विद्यार्थीनी त्यांचे अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत आणावे लेखनिक हवा असल्यास एन टी ए स्वतः देईल. विद्यार्थ्यांना आपला लेखनिक आणता येणार नाही.

 सीएमओ, सिविल सर्जन मेडिकल सुप्रिडेंट यांचे प्रमाणपत्र लेखनिक द्यावा असे असल्यास लेखनिक पुरवला जाईल. अपंग विद्यार्थ्यांना एक तास पाच मिनिटांचा जास्तीचा अवधी दिला जाईल.


15】विद्यार्थ्यांनी कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण मोबाइल फोन किंवा इतर प्रतिबंधित वस्तू आणू नयेत.


16】परीक्षेची वेळ दोन ते पाच वीस

     अशी राहील.

 एकूण वेळ तीन तास वीस मिनिटे राहील.

 विद्यार्थ्याने प्रत्येक विषयाच्या 

★Section A ( मधील दिलेले सर्व प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा आहे.

 ★Section B  मधील 15 पैकी क्रमाने सोडवलेले कोणतेही दहा प्रश्नच ग्राह्य धरले जातील.

  [बरोबर उत्तरासाठी चार गुण  दिले जातील व चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल.]

17】एकापेक्षा जास्त उत्तरे बरोबर असतील तर कोणतेही एक उत्तर दिल्यास चार गुण दिले जातील जर चारही ऑप्शन्स बरोबर असतील व कोणतेही उत्तर दिले तर चार गुण दिले जातील.

 कोणताही ऑप्शन करेक्ट नसेल किंवा प्रश्न चुकीचा असेल तरीही प्रत्येक विद्यार्थ्याला चार गुण दिले जातील.

18】अपडेट केलेले आधार कार्ड असेल

तरच फोटो आयडी म्हणून सोबत न्या  किंवा दुसरी फोटो आयडीची खरी प्रत सोबत न्यावी.

19】परीक्षा चालू असताना कोणत्याही परिस्थितीत परीक्षकांशी वाद-विवाद घालू नये परीक्षकांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे.

 20】प्रथम बायोलॉजी केमिस्ट्री व सर्वात शेवटी फिजिक्सचा पेपर सोडवावा.

21】संपूर्ण पेपर वाचण्यात वेळ घालवू नये जसे वाचत जाल व तस तसे उत्तर सापडत राहील तसे लगेच गोल करत राहावे.

   ● परीक्षकांच्या पूर्व संमती शिवाय बुकलेट वरती कोणत्याही प्रकारच्या खाणाखुणा करू नयेत.

22】तुम्हास दिलेला पेपर कोड व तुमचा अन्सर शीट नंबर एकच आहे की नाही याची खात्री करून घ्यावी वेगवेगळा असेल तर परीक्षकाकडे लेखी तक्रार करावी.

23】पेपर सोडवताना प्रश्न अवघड वाटले म्हणून घाबरून जाऊ नये पुढचे वाचत राहून पुढे पुढे सोडवत रहावे नंतर आपल्याला माईंड सेट झाल्यानंतर बरीच उत्तरे आठवत असतात घाबरून जाऊ नये धीराने पेपर सोडवावा.

24】 परीक्षेच्या आदल्या रात्री  व परीक्षेपूर्वी सुद्धा हलके जेवण घ्यावे आपणास औषधे चालू असतील तर ती वेळेत घ्यावीत या संबंधीची सूचना परीक्षेच्या ठिकाणी गेल्यानंतर परीक्षकांना द्यावी.

25】पेपर सोडवत असताना

 घड्याळाची आवश्यकता नसते. किंबहुना वेळ किती झाला आहे तिकडे पाहूच नये आपले पेपर सोडविण्याचे काम सुरू ठेवावे.

26】 पेपर कसा ही जावो त्याबद्दल निराश होऊ नये गुण जरी कमी पडणार असले तरी पुन्हा पुढे रिपीट करून आपले भविष्य/करिअर आपण घडवू शकतो. अनेक जण तीन तीन वेळा रिपीट करून गेलेले असतात, याची जाणीव ठेवावी.  शासकीय वैद्यकीय कॉलेजलाच ॲडमिशन घ्यावयाचे असल्यास पुरेसे मार्क पडणार नसल्यास पुन्हा लगेच रिपीट ची तयारी सुरू करावी, याबाबत वेळ घालवणेत अर्थ नसतो.

    तुमची स्वप्ने पूर्ण होवोत,  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावे, त्यासाठीचे आवश्यक गुण प्राप्त होवोत ह्याच माझ्यातर्फे पुनश्च एकदा सदिच्छा व प्रार्थना...!!

★विश यू ऑल द बेस्ट..!! बेस्ट लक..!!

             

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...