Monday, May 15, 2023

कठोर परिश्रम करा यश तुमचे जवळ राहील....

दिवस चांगले असतील तर न बोलावताही गाव गोळा होईल.

     आपण कोणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो. महत्त्वाची असते ती समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असलेली गरज... गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा  कांही लोकांचा स्वभावच असतो.  गरज संपली की नातं संपलं, प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला कधीच किंमत देत नसतात...!!

    एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं पण जगायला शिका, जर तुमचे दिवस चांगले असतील तर न बोलावता ही गाव गोळा होईल पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा कोणी येणार नाही....

     मनुष्याच्या दुःखाचे कारण त्याचे दुःख नसून त्याने केलेली सुखाची अपेक्षा असते...! आयुष्यात फक्त professionally जगू नका... कधी कधी Emotionally पण जगा... कारण professionally माणसं फक्त जवळ येतात. आणि Emotionally माणसं जोडली जातात....

     प्रत्येक समस्येवर कांही ना कांही मार्ग असतोच फक्त त्यासाठी विचार शांततेने करावा लागतो".

   प्रवास हा दुःखांचा असतो ज्यामध्ये सुखाचे क्षण प्रवासी म्हणून येतात आणि जातात...!

    इतरांच्या सल्ल्यापेक्षा आपलं मत जास्त महत्त्वाचं  असतं...!

      आनंद हा फक्त पैशाचा वारसदार नसतो... कधी कधी गरीबाच्या घरातलाही तो हक्काचा पाहुणा असतो...!    आयुष्यात आपल्याला काही मिळवायचे असेल तर नम्र व लिन असण्याबरोबर अडकाठी करणाऱ्या कडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते... जसे विहीर खणताना आवाढव्य दगडांना दुर्लक्षित करून सर्वांचे लक्ष त्याखाली खळखळणाऱ्या पाण्याच्या झऱ्याकडेच असते... आणि त्याच विहिरीतून पाणी काढताना बादलीला झुकावे लागते तेंव्हाच मधुर पाणी त्यात मिळते...!!!

     नको त्या गोष्टीला जास्त मोल दिलं की आयुष्याचा तोल साधणं कठीण बनतं. मनाचा व्यवहार जपणारा धनाचा हिशोब ठेवत नाही...!"मनाला चांगल्या विचारायचं कव्हर असेल तर 

◆ माणूस नावाचं पुस्तक

नेहमी चांगलंच दिसतं"

    सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं, ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं. अगदी उगवत्या सूर्यासारखं...!

     प्रेम करणारी माणसं या जगात भेटतच असतात फक्त समजून घेणारी व समजावून सांगणारी माणसं भेटायला भाग्य लागते.

 जे साधं आणि सोप असतं तेच अतिशय छान असतं मग ते जगणं असो की वागणं._

   आनंद वाटणाऱ्याच्या ओंजळी कधीच रिकाम्या नसतात कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान निसर्गाकडून मिळालेलं असतं.

खर्च झाल्याचे दुःख नसतं... हिशोब नाही लागला की वाईट वाटतं._

 देण्याची सवय लावून घ्या मग येणं आपोआप सुरू होईल... मग तो मान असो, प्रेम असो, की वेळ..

एकटा असण्याचं एक बरं असतं... ना कोणी सोडून जाण्याची भीती ना कोणी येईल याची आशा...!!

 ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि जे होतं ते ठरवलेलं असतं असं नाही... यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.आपल्याला तेच लोक बुडवतात ज्यांना आपण पोहायला शिकवलेलं असतो...!! कठोर परिश्रम करा यश ऐके  दिवशी तुमच्या पायाचे चुंबन घेण्यासाठी येईल !

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...