हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन
मराठवाड्याला क्रूर निजामाच्या रझाकारां पासून मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी "पोलीस ॲक्शन" घेऊन कणखरपणे मराठवाडा निझाम राजवटीतून सोडवला तो हा सुवर्ण दिवस.
मराठवाडा मुक्ती संग्रामात बलिदान दिलेल्या असंख्य अनामिक हुतात्म्यांना शतकोटी वंदन.! भारत माता की जय...!!
★इतिहास -
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला होता.